‘तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही, शिंदे सरकार राज्य विकायला निघालंय’, आदित्य ठाकरेंचा घणाघात
शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे दोन वेगवेगळे मेळावे मुंबईत होत आहे. उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा दरवर्षीप्रमाणे दादरच्या शिवाजी पार्क येथे झाला. यंदा प्रथमच शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात युवा नेते आदित्य ठाकरे यांनी भाषण केले.
शिवतीर्थाच्या व्यासपीठावरुन प्रथमच आदित्य ठाकरे बोलत असल्याचे सांगत त्यांनी स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण केले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. इतकंच नाहीतर निवडणुकीच्या आचारसंहितेवर त्यांनी भाष्य केले. ‘६ जानेवारी रोजी आम्ही अरविंद सावंत यांचा प्रचार सुरू केला. तेव्हा सांगितलं की, लोकसभेत बदल घडवायचं आहे. ते वर्ष आलं आहे. परवा एका अधिकाऱ्याने सांगितलं. चर्चा सुरू आहे. आपण सर्व आमदार म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहोत. हे सरकार हजारो कॅबिनेटचे निर्णय घेत आहे. महामंडळांची खैरात होत आहे. जोपर्यंत अदानीची सर्व कामे आणि जीआर निघणार नाही तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही. एका अधिकाऱ्याने मला सांगितलं.’, असे आदित्य ठाकरे म्हणाले. तर पुढे ते असेही म्हणाले, अदानीच्या घशात मुंबई घालयाची की नाही हे ठरवायचे आहे. शिंदे सरकार हे राज्य विकायला निघालं आहे. आपल्याला एकत्र यावं लागेल,. एकजूट दाखवावी लागणार आहे. एकनाथ शिंदेंनी मिंधे सरकारने जेवढा हा महाराष्ट्र भ्रष्टाचार करून महाराष्ट्र लुटला आहे. ए टू झेड भ्रष्टाचार केला आहे.