“चौका पांडे यांना इतक्या वर्षांनी जाग आली का?”, संदीप देशपांडे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर कुणी लगावला टोला
VIDEO | संदीप देशपांडे यांच्या आरोपांना ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर, कुणी केली सडकून टीका बघा व्हिडीओ
मुंबई : मुंबईतल्या गुंडांना शिवसेनेच्या माध्यमातून राज ठाकरेंची सुपारी दिली होती. मालवणमध्ये राज ठाकरेंच्या घातपाताचं षडयंत्र होतं. नारायण राणे यांच्यावर नाव येण्यासाठी मालवणमध्ये घातपाताचं षडयंत्र आखलं होतं.आपल्या पक्षातील प्रतिस्पर्धीचा काटा काढता येईल, अशाप्रकारचं नीच राजकारण झालं होतं, असे वक्तव्य करून मनसे नेता संदीप देशपांडे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. या आरोपानंतर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चौका पांडे यांना इतक्या वर्षांनी जाग आली का? त्या दौऱ्यात मी सुद्धा होते. राजापूरपर्यंत गेले. नंतर राज ठाकरे यांनी दौरा कॅन्सल केला. चौका पांडे यांच्या जीभेला हाड नाही. त्यांचं एक हाड दिल्लीत आहे म्हणून जीभ सैल सुटली आहे. असे म्हणत जोरदार टीका केली आहे.
Published on: Feb 25, 2023 11:13 PM