हक्कभंग नेमका कुणावर? हक्कभंग प्रस्तावावरुन मविआ आणि राज्य सरकारमध्ये खडाजंगी, बघा TV9 मराठीचा रिपोर्ट
VIDEO | विधीमंडळ नव्हे चोरमंडळ या वक्तव्यामुळं संजय राऊत अडचणीत, हक्कभंग प्रस्तावावरुन मविआ विरुद्ध राज्य सरकार आमनेसामने... बघा TV9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळ नव्हे चोरमंडळ असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे संजय राऊत चांगलेच अडचणीत आले आहे. त्यांच्याविरोधात विधीमंडळात हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आलाय. आता मविआनंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू केली आहे. संजय राऊत यांच्या त्या वक्तव्यावरून ते आधीच अडचणीत आले असताना त्यांच्यावर हक्कभंग दाखल होण्याची शक्यता आहे. त्यासाठी समितीही नेमण्यात आली आहे. पण संजय राऊत काही माघार घ्यायला तयार नसल्याचे पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ही जी बनावट शिवसेना आहे, डुप्लीकेट, चोरांचं मंडळ, चोरमंडळ, हे विधीमंडळ नाही, चोरमंडळ हे विधान केलं. यावर विधीमंडळाला चोरमंडळ म्हटल्याबद्दल हक्कभंग प्रस्ताव मांडला गेला आहे.
Published on: Mar 03, 2023 08:07 AM