Sajay Raut : ‘काळजीवाहू मुख्यमंत्री खचले, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य नाही, त्यांचा चेहरा…’, संजय राऊतांचा निशाणा
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झालाय. यावर संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी भाजपसह महायुतीवर निशाणा साधलाय. तर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय.
दिल्लीत झालेल्या महायुतीच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झालाय. यावर संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी भाजपसह महायुतीवर निशाणा साधलाय. राऊत म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी माहिती समोर येत आहे. पहिल्या दिवसापासून हे सुरु आहे. पण तो दिवस सूर्य अजून उजाडत नाही. अजून हा महिना संपायचा आहे. नोव्हेंबर आता संपेल नंतर डिसेंबर उजाडेल. त्यानंतर ५ तारीख येईल. तोपर्यंत आमचे काळजीवाहू मुख्यमंत्री काय करतील याचा काहीही भरोसा नाही, असे म्हणत राऊतांनी हल्लाबोल केलाय. पुढे ते असेही म्हणाले, “माझ्या माहितीप्रमाणे ते मनाने खचलेले आहेत. ते अस्वस्थ आहेत. त्यांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडलेले आहे. त्याला जबाबदार कोण, त्यांच्या प्रकृती का बिघडली, कोणामुळे बिघडली. त्यांना शब्द देऊन कोणी तो शब्द फिरवला आहे का, असे अनेक गंमतीशीर मुद्दे सध्या चर्चेत आहेत. त्यांचा चेहरा पडलेला आहे. ते हसत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर हसू मावळलेले आहे. त्यांच्या डोळ्यात चमक दिसत नाहीत, असेही संजय राऊतांनी म्हटले. यावर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय.