एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यापूर्वी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची धरपकड, कुठं घडली घटना?
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याआधी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याआधी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. तसेच पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची धरपकड केलीय. शिंदे आणि ठाकरे गटाच्या वादाची जळगावातील ही पहिली वेळ नाही. याआधी देखील ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने जळगावात आल्या होत्या तेव्हादेखील मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. सुषमा अंधारे यांनी त्यावेळी ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती. ठाकरे गटाचे तरुण तडफदार नवा चेहरा त्या निमित्ताने समोर आला. जळगावातील शरद कोळी नावाचा तरुणांची महाराष्ट्राशी ओळख झाली. शरद कोळी यांनी अतिशय आक्रमकपणे शिंदे गटावर निशाणा साधला.