प्रचारसभा आटोपून परतत असताना ठाकरे गटाच्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात

| Updated on: Apr 22, 2024 | 1:55 PM

लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्प्यातील मतदान आता होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या प्रचारसभेला जात असताना काल मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यावर अज्ञाने दगडफेक केल्याची घटना घडली होती. तर आज ठाकरे गटाच्या नेत्याचा कारचा भीषण अपघात झालाय.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना राजकीय नेते मंडळी उन्हा-तान्हाची पर्वा न करता आपल्या उमेदवाराला निवडून आणण्याकरता जीवाचं रान करताय. या प्रचारसभेला जात असताना काल मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यावर अज्ञाने दगडफेक केल्याची घटना घडली होती. तर आज ठाकरे गटाच्या नेत्याचा कारचा भीषण अपघात झालाय. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शिवसेना उबाठाचे नेते, रायगड लोकसभा मतदार संघाचे समन्वयक संजय कदम यांच्या कारला ट्रकने मागून धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळतेय. रायगड जिल्ह्यातील रोह्याहून प्रचार सभा आटोपून ते मुंबईला परत जात होते. रात्रीच्या सुमारा मुंबई-कुर्ला मार्गावर त्यांच्या कारला आयशर ट्रकने मागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये कारचे मोठे नुकसान झाले असले तरी संजय कदम आणि कारमधील इतर कोणालाही दुखापत झालेली नाही. सर्वजण सुखरूप आहेत.

Published on: Apr 22, 2024 01:55 PM
फडणवीसच नाही तर महाजन, शेलारांसह दरेकरांच्या अटकेचा डाव, मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट
ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाची नोटीस, प्रकरण काय?