Aaditya Thackeray Video : दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, ‘आता जे होईल ते होईल, एकच सांगेल…’

| Updated on: Mar 20, 2025 | 1:25 PM

. सतीश सालियन यांनी कोर्टात याचिका दाखल करून आदित्य ठाकरेंसह अनेकांवर गंभीर आरोप केला आहे. आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियनचं मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या प्रकरणासंदर्भात दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेत सामूहिक बलात्कार करून दिशाची हत्या केल्याचा कुटुंबाकडून आरोप केला जात आहे. या आरोपासह आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली आहे. अशातच याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरेंसह महाविकासाआघाडीच्या नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांच्या प्रतिनिधी दिशा सालियन प्रकरणावर सवाल केला. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, पाच वर्ष हे चालू आहे. कोर्टात जे होईल ते होईल. मी एकच सांगेल पाच वर्ष बदनामीचा प्रयत्न सातत्याने होत आहे. त्यामुळे आता कोर्टात बोलू, असं थेट उत्तर आदित्य ठाकरेंनी दिले आहे.

तर विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांवर आदित्य ठाकरे म्हणाले, गेल्या पाच वर्षापासून बदनामीचा प्रयत्न होत आहे. कोर्टात प्रकरण आहे. कोर्टात बोलू. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की, तुम्हाला वारंवार सांगितलं की, माझं ट्विट पाहिलं असेल. आम्ही या सरकारला या अधिवेशनात एक्सपोज केलं आहे. आम्हीच नाही तर संघानेही एक्सपोज केलं आहे. काल तर संघाचे लोकही म्हणाले की औरंगजेब हा विषय चुकीचा आहे. मग भाजपचे मंत्री त्यावर कारवाई करणार का? आम्ही हाच प्रश्न विचारत आहे. महाराष्ट्र नेऊन कुठे ठेवला आहे. आज महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्या होत आहे. राज्याची स्थिती बिकट होत आहे. एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. आज हाऊस माझ्यावरून बंद पाडत आहेत. तुम्ही सत्ताधारी आहात. काम करायला निवडून दिलं आहे, असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर त्यांनी संताप व्यक्त केला.

Published on: Mar 20, 2025 01:25 PM
Aurangzeb Tomb : पुरातत्व विभागाने औरंगजेबाच्या कबरीजवळ ठोकले पत्रे
Bachchu Kadu : बच्चू कडुंचं उद्यापासून रायगडच्या पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन