Saamana : ‘हे षड्यंत्र…’, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार? ‘सामना’तून संजय राऊतांचा हल्लाबोल

| Updated on: Oct 20, 2024 | 12:11 PM

अमित शहांसह महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना आपण महाराष्ट्र गमावू याविषयी खात्री पटली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी जिंकली तरी त्यांना सरकार स्थापनेस पुरेसा वेळ मिळू नये. त्यानंतर सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती शासन लावून राज्य करायचे असा डाव दिसतोय, असं म्हणत संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय

Follow us on

महाराष्ट्रात सहा महिने राष्ट्रपती राजवट लागू करून राज्य करण्याचा डाव असल्याचे आजच्या सामनातील रोखठोकमधून म्हटले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी फक्त 35 दिवसांचा कालावधी उरला असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. तर 26 तारखेपर्यंत सरकार बनवाने लागणार आहे. आघाडीच्या राजकारणात सरकार बनवण्यासठी फक्त 48 तास मिळतील आणि त्यात वेळ काढला तर अमित शाह हे महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रवती राजवट लावतील, असं संजय राऊत यांनी सामनातून म्हटले असून जोरदार टीकास्त्र डागलंय तर हे षडयंत्र असून ते उधळून लावण्यास हवे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत. ’20 नोव्हेंबरला मतदान होईल. 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. मतमोजणीचे काम 24 तारखेपर्यंत चालेल. महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरपर्यंत आहे. म्हणजे 24 ते 26 असा 48 तासांचा वेळ नवे सरकार बनविण्यासाठी मिळेल. तो पुरेसा नाही. 48 तासांत सरकार स्थापन करून शपथग्रहण करावी लागेल. या काळात दोन्ही आघाडय़ांना आपापल्या आमदारांना एकत्र करत बहुमत दाखवावे लागेल. हे सर्व निकालानंतरच्या 48 तासांत घडले नाही तर विधानसभेचा कालावधी संपणार आणि नवी विधानसभा अस्तित्वात आली नाही म्हणून राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची शिफारस राज्यपाल करतील. त्याच योजनेचा भाग म्हणून महाराष्ट्रात घाईघाईने निवडणुका घेऊन भाजप आपले मनसुबे पूर्ण करतंय’, असं संजय राऊत यांनी म्हटलं असून थेट निशाणा साधला आहे.