साहेब काही जरी झालं तरी… मुलाचं भाषण ऐकत असताना भास्कर जाधवांच्या डोळ्यात अश्रू तरळले

| Updated on: Mar 10, 2024 | 2:39 PM

आमदार भास्कर जाधव यांनी रविवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव यांनीही विरोधकांवर हल्लाबोल करत आक्रमक भाषण केले. हे आक्रमक भाषण करत असताना भास्कर जाधव हे काहिसे भावनिक झाले आणि...

चिपळूण, रत्नागिरी : 10 मार्च 2024 : शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी रविवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव यांनीही विरोधकांवर हल्लाबोल करत आक्रमक भाषण केले. हे आक्रमक भाषण विक्रांत जाधव करत असताना भास्कर जाधव हे काहिसे भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रूही तरळल्याचे पाहायला मिळाले. ‘भास्कर जाधव इतके हलके नाही की कोणी धक्का लावल्यामुळे ते पडतील. त्यांनी भल्ला भल्या लोकांना धक्का लावला आहे. कोणी आपल्याकडे येतो, काही सभा घेतो आणि वाटेल ते साहेबांवर बोलतो. तेव्हा आपण का गप्प बसतो. त्यांच्या एखादा खालचा कार्यकर्ता बोलतो तेव्हा आपण गप्प बसायला नको. त्यांना उत्तर दिले पाहिजे. आता तुम्ही सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे.’, असे विक्रांत जाधव म्हणाले. आज तुम्ही सर्वांनी साहेबांना सांगितले पाहिजे, साहेब काही जरी झाले तरी आम्ही तुमचे कडे बनून तुमच्यासोबत राहू. हे सांगण्यासाठी तुम्हाला सर्वांना बोलवले. येत्या काळात जेव्हा वेळ पडेल तेव्हा ठाम उभे राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

Published on: Mar 10, 2024 02:39 PM
ताई-दादांमधला दुरावा कायम, आज पुन्हा एकाच मंचावर पण बोलणं टाळलं; यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या…
भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार? नेमकं काय म्हणाले…?