केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची काल बदली केली आहे. विरोधकांकडून सातत्याने होणाऱ्या मागणीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय घेत रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली केली आहे. आता ठाकरे गट शिवसेना नेते संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. सरकार बेकायदेशीर असून त्यांनी बेकायदेशीर पद्धतीने अनेक नेमणुका केल्यात ज्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेत, ज्या अधिकाऱ्याने विरोधकांचे फोन टॅप केले, ज्या अधिकारी तुरूंगात जाण्याच्या तयारी होत्या, त्यांना सरकार बदलताच गुन्हे काढून थेट पोलीस महासंचालकपदाचे बक्षीस देण्यात आले, त्यांच्याकडून अनेक राजकीय गैरकृत्य करून घेतली. अशा व्यक्तीच्या हातात महाराष्ट्रासारख्या राज्याच्या निवडणुकाची सूत्र असू नये हे आम्ही वारंवार सांगत होतो. अखेर पापाचा घडा भरला आणि आयोगालाच लाज वाटलयाने देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या ताईला हटवण्यात आले, असं संजय राऊत यांनी म्हटलं आणि सरकारवर हल्लाबोल केला. बघा आणखी काय म्हणाले संजय राऊत?