‘आई-बहि‍णींची मी माफी…’, अंबादास दानवेंच्या ‘त्या’ शिवीगाळच्या वक्तव्यावरून ठाकरेंकडून जाहीर माफी

| Updated on: Jul 03, 2024 | 11:59 AM

अंबादास दानवे आपली भूमिका मांडत असताना सत्ताधारी आमदारांनी आरडाओरड केली. यानंतर अंबादास दानवे यांचा तोल सुटला आणि त्यांनी प्रसाद लाड यांच्यावर भर सभागृहात शिवीगाळ केली. यानंतर अंबादास दानवे यांचं अखेर पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. तर ठाकरेंनी दानवेंच्या वतीने माफी मागितली.

विधानपरिषदेत भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्यानंतर अंबादास दानवे यांचं अखेर पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. तर पक्षप्रमुख या नात्यानं उद्धव ठाकरे यांनी दानवेंच्या वतीने महिलांची माफी मागितली. कामकाज सुरू होताच संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या पाच दिवसाच्या निलंबनावर प्रस्ताव सादर केला. यावर आवाजी मतदान करून उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांचं निलंबन केलं. निलंबनाच्या ठरावावर विरोधकांनी चर्चेची मागणी केली. पण ही मागणी फेटाळण्यात आली. तर उद्धव ठाकरे यांनी एकतर्फी निलंबनाचा ठराव अपराध असल्याचे म्हटले आहे. सभागृहात आपल्याला संधी दिली असती तर प्रसाद लाडच नाहीतर सभागृहाची दिलगिरी व्यक्त केली असती, असं दानवे म्हणाले. बघा नेमका काय झाला गदारोळ?

Published on: Jul 03, 2024 11:59 AM
विधान परिषदेच्या 11 जागा अन् 12 जण रिंगणात, आमदारांची पुन्हा परीक्षा, कोणाची मतं फुटणार? कोणाचा एक उमेदवार पडणार
Maharashtra Rain Forecast : ‘या’ महिन्यात महाराष्ट्र चिंब भिजणार, तुमच्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस? अलर्ट जारी; हवामान खात्याकडून मोठं अपडेट