Loksabha Election 2024 : श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात लोकसभा लढणाऱ्या वैशाली दरेकर कोण?

| Updated on: Apr 03, 2024 | 6:04 PM

उद्धव ठाकरे यांनी आज चार मतदारसंघातील उमेदवारांची लोकसभेसाठी नावं जाहीर केली. शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात रणरागिणी वैशाली दरेकर यांचा सामना होणार आहे. पण कोण आहेत श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात लोकसभा लढणाऱ्या वैशाली दरेकर? जाणून घ्या त्यांच्याबद्दल अधिक माहिती...

माजी मुख्यमंत्री आणि उबाठाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज चार मतदारसंघातील उमेदवारांची लोकसभेसाठी नावं जाहीर केली. जळगावमधून करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पालघरमधून भारती कामडी यांना तर हातकणंगलेमधून सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कल्याण-डोंबिवलीतून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात रणरागिणी वैशाली दरेकर यांचा सामना होणार आहे. पण कोण आहेत श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात लोकसभा लढणाऱ्या वैशाली दरेकर? शिवसेना, मनसे ते पुन्हा ठाकरे गट असा वैशाली दरेकर यांचा राजकीय प्रवास आहे. वैशाली दरेकर या शिवसेनेच्या नगरसेविका होत्या. पण मनसेच्या स्थापनेनंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी २००९ मध्ये मनसेकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि पहिल्या प्रयत्नातच त्यांनी १ लाखांहून अधिक मतं मिळवली आणि त्या चर्चेत आल्या… बघा त्यांच्याबद्दल अधिक माहिती

Published on: Apr 03, 2024 05:29 PM
माझ्या अश्रूंवर टीका केली, त्यांना माफी नाही; प्रतिभा धानोरकरांचा रोख कुणावर?
Loksabha Election 2024 : उन्मेष पाटील यांचे कट्टर समर्थकाला जळगावातून तिकीट, कोण आहे करण पवार?