भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या पोरांचे पाळणे… राऊतांचा भाजपवर निशाणा
उद्धव ठाकरे यांनी मोदी परिवारवरून भाजपसह नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. त्यानंतर याच मुद्यावरून शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.
मुंबई, १८ मार्च २०२४ : शिवतीर्थावर काल इंडिया आघाडीची जाहीर सभा झाली. यावेळी इंडिया आघाडीकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोदी परिवारवरून भाजपसह नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. त्यानंतर याच मुद्यावरून शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘स्वतःच्या पोरांचे पाळणे हलवा दुसऱ्यांच्या पोरांचे पाळणे हालवू नका ते पुन्हा पळून जातील’ असा हल्लाबोल राऊतांनी केला. भारतीय जनता पार्टी हा पक्ष दुसऱ्यांची पोरं पळवून मोठा झालेला पक्ष आहे. त्यांना स्वतःची पोरं नाही. ते आमची पोरं फोडून त्यांना घेऊन बसलेत. स्वतःच्या पोरांची पाळणे हलवा…दुसऱ्यांच्या पोरांचे पाळणे नका हलवू ते परत पळून जातील, असा निशाणाही राऊतांनी भाजपवर साधला.
Published on: Mar 18, 2024 01:06 PM