Sushma Andhare : ‘पंकजा मुंडे 12 वर्ष वनवासात होत्या अन् बऱ्याच गोष्टी त्यांना इच्छेविरुद्ध…’, सुषमा अंधारे यांचा टोला

| Updated on: Nov 15, 2024 | 12:43 PM

पंकजा मुंडे या बारा वर्षे वनवासात होत्या, असं वक्तव्य करत पंकजा मुंडे यांना पक्षात अनेक गोष्टी इच्छेविरोधात कराव्या लागतात, बटेंगे तो कटेंगे या मुद्यावरून सुषमा अंधारे यांनी पंकजा मुंडे यांना टोला लगावला आहे.

पंकजा मुंडे या बारा वर्षे वनवासात होत्या, आता कुठे त्या स्थिर झाल्या आहेत. त्यामुळे त्यांची इच्छा असली तरी बऱ्याच गोष्टी त्यांना इच्छेविरुद्ध कराव्या लागतात, असे वक्तव्य करत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला. सुषमा अंधारे यांनी पंकजा मुंडे यांच्या बटेंगे तो कटेंगे, या विधानावरून केलेल्या घुमजावावरून टोला लगावला आहे. तसेच त्यांच्याच महायुतीतील पार्टनर असणाऱ्या अजितदादांनी देखील याबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे, असे मत देखील सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी सुषमा अंधारे या सांगलीच्या मिरजेमध्ये होत्या. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्या प्रचार सभेनिमित्त सुषमा अंधारे बोलत होत्या त्यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर भाष्य करत टोला लगावला आहे. बघा व्हिडीओ

Published on: Nov 15, 2024 12:43 PM
Sharad Pawar : अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्…, बघा व्हिडीओ
Devendra Fadnavis : ‘…म्हणून राष्ट्रपती राजवट लागली’, शरद पवारांचं नाव घेत देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट