Uttar Pradeshमध्ये निवडणूक लढवून Shivsena पक्षाचं अस्तित्व दाखवणार -संजय राऊत
शिवसेना उत्तर प्रदेशची निवडणूक लढवणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. उत्तर प्रदेशच्या सर्व भागात 50 ते 100 जागांसाठी आम्ही उमेदवार उतरवणार आहोत. अनेक लहान घटक आहेत, ते आम्हाला भेटत आहेत. या वेळेला शिवसेनेने निवडणूक लढवावी अशी त्यांची मागणी आहे, असे राऊत म्हणाले.
मुंबई : शिवसेना उत्तर प्रदेशची निवडणूक लढवणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. उत्तर प्रदेशच्या सर्व भागात 50 ते 100 जागांसाठी आम्ही उमेदवार उतरवणार आहोत. अनेक लहान घटक आहेत, ते आम्हाला भेटत आहेत. या वेळेला शिवसेनेने निवडणूक लढवावी अशी त्यांची मागणी आहे. निवडणुकीत काय होईल तो पुढचा प्रश्न आहे. मात्र शिवसेनेचे उत्तर प्रदेशमध्ये अस्तित्व दाखवले पाहिजे. एका लढ्यातील हा एक पक्ष आहे. उत्तर प्रदेशची ही गरज आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सर्व खासदार, पक्षाचे प्रमुख लोक यांनी यामध्ये लक्ष घातलं आहे. त्यामुळे यावेळी उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आमचे प्रतिनिधी असतील याची मला खात्री आहे, असे संजय राऊत म्हणाले.