एकनाथ शिंदेंचा शिवसेनेतील मंत्रिपदासाठी इच्छुक अन् नाराजांसाठी तोडगा, प्रथम संधी मिळताच….
येत्या १६ तारखेला नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यापूर्वी १४ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेची यादी अंतिम शिक्कामोर्तबसाठी दिल्लीला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ८ ते १० मंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता आहे. अशातच येत्या १४ तारखेला राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. तर शिंदेच्या संभाव्य यादीमध्ये उदय सामंत, शंभूराज देसाई, तानाजी सावंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, राजेश क्षीरसागर, प्रकाश सुर्वे, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, भरत गोगावले, हेमंत पाटील यांची नावं असल्याचे कळतंय. मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील मंत्रिपदासाठी इच्छुक अन् नाराज असणाऱ्यांसाठी तोडगा काढल्याची माहिती मिळत आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये इच्छुक असणाऱ्यांसाठी अडीच अडीच वर्ष मंत्रिपदं देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यासह प्रथम संधी मिळाली तर अशा मंत्र्यांना अडीच वर्षानंतर पदमुक्त करणार असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यानुसार इच्छुक आमदारांच्या नाराजीचा सूर दूर करण्यासाठी प्रत्येकाला अडीच वर्ष मंत्रिपदं दिलं जाईल, असे सांगितले जात आहे. तर या अडीच वर्षांनंतर त्यांना पदमुक्त करण्यात येणार असल्याचेही सूत्रांची माहिती आहे.