Special Report | शिवसेना यूपीएत सहभागी होणार?
2022 मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना यूपीएमध्ये (UPA) सहभागी होण्याची शक्यता वाढली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.
नवी दिल्ली: महाराष्ट्रात (Maharashtra ) महाविकास आघाडीच्या (MVA) प्रयोगाद्वारे शिवसेना (Shivsena), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापन केली. शिवसेना यासाठी 2019 मध्ये एनडीएतून (NDA) बाहेर पडली. 2022 मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना यूपीएमध्ये (UPA) सहभागी होण्याची शक्यता वाढली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. शिवसेना खासदार संजय राऊत लवकरच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
संजय राऊत राहुल गांधी प्रियंका गांधी यांची भेट घेणार
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांच्या निवडणुकांबाबत शिवसेना निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याची माहिती आहे. संजय राऊत, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना भेटणार आहेत. राऊत उद्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. तर. बुधवारी प्रियंका गांधी यांची भेट घेतील.