केंद्र सरकारविरोधात घरकुल लाभार्थ्यांसह शिवसेनेचे धरणे आंदोलन
महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील अनेक नेते केंद्राच्या कार्य पध्दतीवरती टीका करीत असतात. कारण केंद्राकडून महाराष्ट्राला दुजाभाव दिला जातो. त्याचबरोबर आता शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी देखील केंद्रात असलेल्या भाजपच्या अनेक नेत्यांवरती टीका केल्याचे पाहायला मिळत आहे,
महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील अनेक नेते केंद्राच्या कार्य पध्दतीवरती टीका करीत असतात. कारण केंद्राकडून महाराष्ट्राला दुजाभाव दिला जातो. त्याचबरोबर आता शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी देखील केंद्रात असलेल्या भाजपच्या अनेक नेत्यांवरती टीका केल्याचे पाहायला मिळत आहे, त्यांनी घरकुल योजनेसह अनेक मागण्यांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. त्यामध्ये त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देखील दिल्या आहेत. सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणात केंद्र सरकारकडून हस्तक्षेप होत असल्याचे म्हटलं जात आहे, कारण अनेक आमदारांना आणि खासदारांना भाजपच्या नेतृत्वाकडून धमकावून त्यांच्या पक्षात येणाचं आमंत्रण दिल जात आहे.