चिऊताईला वाचवण्यासाठी ‘त्याची’ धडपड, घरातच केली 225 घरटी अन् चिमण्यांना दिला आश्रय

| Updated on: Apr 04, 2023 | 10:44 PM

VIDEO | मुक्या पशुपक्ष्यांना वाचविण्यासह स्वतःच्या आत्मिक समाधानासाठी त्यांचा अनोखा संघर्ष, कोण आहे तो चिमणी प्रेमी?

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात राहणाऱ्या शिवशंकर यादव या चिमणी प्रेमीचा मुक्या पशुपक्ष्यांना वाचविण्यासाठीचा संघर्ष वाखाणण्याजोगा आहे. ते स्वतः एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. सध्या कंपनी बंद पडल्याने निम्म्या पगारावर त्यांचे कुटुंब गुजराण करत आहे. चिमण्यांचे संगोपन, पिलांची आणि जखमी चिमण्यांची शुश्रुषा यासह त्यांचा सांभाळ करून शिवशंकर यादव यांना मोठे समाधान लाभत आहे. चिमण्या आहेत म्हणून आपण आहोत. त्यामुळे मला जे शक्य आहे ते करतोय असेही ते म्हणतात. चंद्रपूरकर चिमणीप्रेमी शिवशंकर यादव यांनी चिमण्यांसाठी घरातच 225 लाकडी घरटी तयार केली. मुक्या पशुपक्ष्यांवर प्रेम आणि आत्मिक समाधानासाठी स्वखर्चातून बांधलेली घरटी आकर्षण ठरत आहेत. पुढील काळात आर्थिक झळ सोसूनही आणखी शंभर घरटी तयार करण्याचा मानस आहे.

Published on: Apr 04, 2023 10:44 PM
कोण होतास तू काय झालास तू…, देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल
चुलीवरच्या बाबानंतर पाण्यावर तरंगणारा बाबा, ‘अंनिस’लाही दिलं चॅलेंज अन् काय घडलं?