पुण्यात काही बाप्पांच्या मूर्तीवरून संभाजी ब्रिगेडचा आक्षेप, आक्रमक होण्याचं कारण नेमकं काय?

| Updated on: Sep 09, 2024 | 12:10 PM

मुंबई, पुण्यातसह राज्यभरात गणेशोत्सवाची धूम आणि एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. अशातच घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात लाडक्या बाप्पाचं आगमन झालं असून बाप्पा थाटात विराजमान झाला आहे. तर दुसरीकडे पुण्यातील काही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे.

पुण्यात काही गणपती बाप्पाच्या मूर्तीवरून संभाजी ब्रिगेडकडून आक्षेप घेण्यात आला आहे. शिवाजी महाराज आणि गणपती बाप्पाची एकत्र मूर्ती असल्याने संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. इतकंच नाहीतर मूर्तीकारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे. पुण्यात काही ठिकाणी विक्रीसाठी असलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तींवर संभाजी ब्रिगेडकडून आक्षेप घेण्यात आला आहे. पुण्यात गणपती आणि शिवाजी महाराज यांची एकत्रित मूर्ती साकारण्यात आली आहे. यावरूनच संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. दरम्यान, ज्या गणपती बाप्पाच्या मूर्तीवरून वाद झाला होता. त्या मूर्तीकाराने संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपावर स्पष्टीकरण दिलं आहे. अनावधानानं मूर्ती साकारली, सर्वांची माफी मागतो, असे मूर्तीकाराने म्हटलंय. देशभरात सध्या गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. मात्र दुसरीकडे गणपती आणि शिवाजी महाराजांची एकत्रित असलेली मूर्ती साकारणाऱ्या मूर्तीकारांना संभाजी ब्रिगेडकडून इशारा देण्यात आला आहे.

Published on: Sep 09, 2024 11:56 AM
आपल्याच मुलीला नदीत फेकण्याची भाषा, धर्मरावबाबा आत्रामांचं टीकास्त्र अन् पवार गटाचा पलटवार
शरद पवार लालबागच्या राजाच्या दरबारी, नात अन् जावयासोबत बाप्पाच्या चरणी लीन