शिवाजीराव आढळराव पाटील यांना कोरोनाची लागण, सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली माहिती
शिवसेनेचे नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना कोरोना संसर्ग झाला आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कोरोना संसर्ग झाल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे.
शिवसेनेचे नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना कोरोना संसर्ग झाला आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कोरोना संसर्ग झाल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. कोरोना संसर्ग झाल्यानं डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार घेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. शिवसेनेचे सचिन अहिर यांना देखील कोरोना संसर्ग झाला आहे. राज्यातील बड्या नेत्यांना कोरोना संसर्ग होण्याची मालिका सुरुच असल्याचं चित्र आहे.
Published on: Jan 09, 2022 10:03 AM