अमोल कोल्हेंना ‘त्या’ चंदेरी दुनियेची आठवण करुन आढळरावांनी सुनावले खडेबोल
शरद पवार यांच्या नावाने मते मागण्याचे दिवस आता राहिले नाहीत. शरद पवार साहेब त्यांच्या जागेवर आहेत. मात्र आपण कुठेच नाही, अशा शब्दात आढळराव पाटीलांनी अमोल कोल्हेंना चंदेरी दुनियेची आठवण करुन देत खडेबोल सुनावले आहेत. बघा काय म्हणाले शिवाजीराव आढळराव पाटील?
शरद पवार यांच्या नावाने मते मागण्याचे दिवस आता राहिले नाहीत, अशा शब्दात आढळराव पाटीलांनी कोल्हेंना चंदेरी दुनियेची आठवण करुन देत खडेबोल सुनावले आहेत. अमोल कोल्हे यांना यांच्या चंदेरी दुनियेची सुद्धा आढळराव यांनी खिल्ली उडवली. ‘आम्ही कुठे तरी चंदेरी दुनियेत लोकांना न्यायचं आणि खोटी आश्वासनं द्यायची असा प्रकार होत असल्याचा आरोप आढळराव पाटीलांनी केला. शरद पवारांना आम्ही विसरु शकत नाही वळसे पाटलांसह मला आजही शरद पवारांबद्दल आदर असल्याची भावना आढळराव पाटलांनी व्यक्त केली आहे. मात्र अमोल कोल्हे शरद पवारांचे नाव घेऊनच प्रचार करताय. शरद पवार हे नाव सोडून कोल्हेंकडे दुसरं भांडवलच नाही. शरद पवारांसोबत निष्ठा ठेवून उभा आहे, असं सांगून मतं मागणार असाल पण शरद पवारांची गोष्ट वेगळी आहे. आता त्यांच्या नावाने मत मागण्याचे तुमचे दिवस गेलेत, अशा आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंना सुनावले. आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे पंचायत समिती गटातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आढळराव पाटील बोलत होते.