सोलापूर जिल्ह्यातील शिवयोगी सिध्दरामेश्वर यात्रेला सुरुवात
सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिध्दरामेश्वरांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झालीय. एकूण चार दिवस चालणाऱ्या यात्रेच्या आजच्या पहिल्या दिवशी 68 लिंगाना तैलाभिषेक करुन यात्रेला सुरुवात.
सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिध्दरामेश्वरांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झालीय. एकूण चार दिवस चालणाऱ्या यात्रेच्या आजच्या पहिल्या दिवशी 68 लिंगाना तैलाभिषेक करुन यात्रेला सुरुवात होतेय. यात्रेचे मुख्य मानकरी असलेले हिरेहब्बू कुटुंबीय योगदंड घेऊन मंदिराकडे रवाना होतात. दरवर्षी पायी चालत हातात नंदीध्वज घेऊन नगरप्रदक्षिणा घातली जाते. मात्र कोरोनामुळे यंदाच्या वर्षी यात्रेवर मोठ्याप्रमाणात निर्बंध घालण्यात आलेत. त्यामुळे पायी नंदीध्वज मिरवणुक काढण्यास प्रशासनाने मनाई केलीय. मानाचे सातही नंदीध्वज यंदा जागेवरच पूजन केले जाणारेत. सकाळी 9 वाजता मानकरी हिरेहब्बू योगदंडासह मंदिराकडे रवाना होतील. हिरेहब्बू वाड्यासमोर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. केवळ पास धारक व्यक्तींना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. दरवर्षी लाखोंच्या उपस्थितीत होणारी यात्रा कोरोनामुळे केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत पार पाडण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.