ShivendraRaje Bhosale | उदयनराजे भोसले अफाट बुद्धीचे म्हणून हातची खासदारकी सोडली-शिवेंद्रराजे
शिवेंद्रराजेंनी पुन्हा उत्तर दिलय उदयनराजेंची बुद्धी जर आमच्या पेक्षा जास्त आहे तर लोकांनी नोवडून दिलेलं खासदारकीचं पद सोडून पुन्हा उभं राहून पराभूत झालात. याला काय म्हणायचं? असा सवाल शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंना केला आहे.
सातारा : साताऱ्यातले राजकारण नेहमी चर्चेत असते ते उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमुळे. दोन्ही राजेंमधील राजकीय वैर साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. दोन्ही राजे आता भाजपमध्ये आल्यावर किमान आतातरी हे संपेल असे सर्वांना वाटत होते, मात्र अजूनही एकमेकांना टोमणे मारायला राजे विसरत नाहीयेत. आम्ही कुणाची घरे फोडली नाहीत, असे वक्तव्य काल उदयनराजेंनी केले होते, त्यानंतर आज शिवेंद्राराजेंनी उदयनराजेंना टोमणा मारला आहे.
खासदारकीवरून शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोमणा
शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना नारळफोड्याची उपमा दिल्यानंतर उदयनराजेंनी सुद्धा शिवेंद्रराजेंवर टिका करत त्यांची बुद्धी छोट्या मुलांच्या पेक्षासुद्धा कमी आहे असे म्हटले होते. शिवेंद्रराजे हे बालीश विधानं करत असल्याचं सांगत त्यांनी टीका करताना भान राखायला हवं असं ते म्हणाले होते. मात्र याला शिवेंद्रराजेंनी पुन्हा उत्तर दिलय उदयनराजेंची बुद्धी जर आमच्या पेक्षा जास्त आहे तर लोकांनी नोवडून दिलेलं खासदारकीचं पद सोडून पुन्हा उभं राहून पराभूत झालात. याला काय म्हणायचं? असा सवाल शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंना केला आहे.