उद्धव ठाकरेंची भेट मिळेना, सकाळी 8 पासून शिवसैनिक मातोश्रीच्या दारात उभा

| Updated on: Sep 16, 2022 | 5:42 PM

उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक मातोश्रीवर येत असतात. असेच एक शिवसैनिक मोहन साहेबराव यादव आज मुंबईत आले.

मुंबई: उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक मातोश्रीवर येत असतात. असेच एक शिवसैनिक मोहन साहेबराव यादव आज मुंबईत आले. सकाळी 8 वाजल्यापासून ते मातोश्रीबाहेर उभे आहेत, पण अजून त्यांना भेट मिळालेली नाही. ते मूळचे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुका नांदगावचे आहेत. उद्धव ठाकरेंची भेट मिळावी, यासाठी ते आपल्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन आले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना फोन करुन पाहिले. पण त्यांना कोणाकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

अखेरच्या क्षणी असं काय झालं? प्रकल्प गुजरातला कसा गेला? – आदित्य ठाकरे
हिंदुत्व आणि अमोल कोल्हे हा बेगडीपणा – शिवाजीराव अढळराव पाटील