शिवतीर्थावरील मेळाव्यात हुबेहूब बाळासाहेब! ठाकरे गटाच्या मेळाव्यात कुणी वेधलं लक्ष?
VIDEO | शिवाजीपार्क म्हणजेच शिवतीर्थावर वेगवेगळ्या वेशभूषा करत तसेच झेंडे, बाळासाहेबांचा रथ, मशाली घेऊन कार्यकर्ते सकाळपासूनच दाखल होत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात हुबेहूब बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या दिसणाऱ्या शिवसैनिकाने वेधले लक्ष
मुंबई, २४ ऑक्टोबर २०२३ | मुंबईमध्ये आज दोन मोठे मेळावे पार पडणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदान तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजीपार्क अर्थात शिवतीर्थावर होणार आहे. या दोन्ही मेळाव्याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर आता शिवसेनेचे दोन मेळावे होणार आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला शिवसैनिक जमायला सुरुवात झाली आहे. दरम्यान शिवाजीपार्क म्हणजेच शिवतीर्थावर वेगवेगळ्या वेशभूषा करत तसेच झेंडे, बाळासाहेबांचा रथ, मशाली घेऊन कार्यकर्ते सकाळपासूनच दाखल होत आहेत. यामध्ये सर्वांचे लक्ष एक शिवसैनिक वेधून घेत आहे. त्याचे कारण म्हणजे हुबेहूब बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखा दिसणारा हा शिवसैनिक आहे.
Published on: Oct 24, 2023 06:00 PM