Video : शिंदे सरकार कोसळणारच, हवं तर तुम्ही लिहून घ्या- आदित्य ठाकरे

| Updated on: Jul 21, 2022 | 2:48 PM

शिवसेनेशी, उद्धव ठाकरेंशी गद्दारी करत स्थापन झालेलं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडवणीस (Devendra Fadanvis) यांचं सरकार एक ना एक दिवस दिवस कोसळणारच. हे तुम्ही लिहून घ्या, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे. भिवंडीत आज शिवसंवाद यात्रेदरम्यान ते बोलत होते. त्यांची ही आक्रमक शैली नवीन होती. कारण ते नंहमी संयमी बोलताना […]

शिवसेनेशी, उद्धव ठाकरेंशी गद्दारी करत स्थापन झालेलं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडवणीस (Devendra Fadanvis) यांचं सरकार एक ना एक दिवस दिवस कोसळणारच. हे तुम्ही लिहून घ्या, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे. भिवंडीत आज शिवसंवाद यात्रेदरम्यान ते बोलत होते. त्यांची ही आक्रमक शैली नवीन होती. कारण ते नंहमी संयमी बोलताना दिसतात. सध्या मात्र शिवसेनेत निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आदित्य आक्रमक झाल्याचं दिसत आहे.  आदित्य ठाकरे यांनी आज नाशिक आणि भिवंडी येथे शिवसैनिकांना संबोधित केलं. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून आलेलं सरकार फार काळ टिकणार नाही. शिंदे गटातील लोकांनी पक्षाशी किंवा शिवसेनाप्रमुखांशीच गद्दारी केली नाही तर माणुसकीशी गद्दारी केली. राजकारणाची पायरी सोडली, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. तसेच शिवसेनेच्या बळावर निवडून आलेल्यांनी पुन्हा एकदा निवडणुकीत उतरून दाखवावे, असं आव्हानही त्यांनी दिलंय.

Video : आदित्य ठाकरेंचा आदेश, पुर्वेश सरनाईक यांची युवासेनेतून हकालपट्टी
Video : “…म्हणून मी शिवसेनेतून बाहेर पडलो”, छगन भुजबळांनी सांगितला ‘तो’ किस्सा