Special Report | ठाकरेंना पूर्वकल्पना पण, पवारांच्या मनात काय?

| Updated on: Jul 17, 2021 | 10:09 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar meet Narendra Modi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

राजधानी दिल्लीत भेटीगाठींचं सत्र सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar meet Narendra Modi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. या भेटीची चर्चा सुरुच असताना, तिकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर दोघेही उपराष्ट्रपतींच्या बैठकीसाठी एकाच गाडीतून रवाना झाले. संसदेचं पावसाळी अधिवेशन 19 जुलैला सुरु होणार आहे. 13 ऑगस्टपर्यंत अधिवेशनाचं कामकाज चालणार आहे. (ShivSena alert after Sharad Pawar-Narendra Modi meeting)

Published on: Jul 17, 2021 08:45 PM
10 th Result | 10 वीची वेबसाईट हॅंग प्रकरणी चौकशी समिती स्थापना करणार, वर्षा गायकवाड यांची माहिती
Special Report | शरद पवार-मोदींच्या भेटीनंतर शिवसेना अलर्ट?