बापासाठी लेकीचा प्रचार, अमित ठाकरेंविरोधात प्रिया सरवणकर भिडल्या, संदीप देशपांडेंवरही निशाणा, ‘लाथ घालून वरळीत…’

| Updated on: Nov 15, 2024 | 10:43 AM

माहिम मतदारसंघात अमित ठाकरेंच्या विरोधात सदा सरवणकरांच्या मुला-मुलींनी टीकास्त्र सोडलंय. अमित ठाकरे यांचं कर्तृत्व काय? नवीन चेहरा आणून काय पिक्चर काढायचा आहे का? अशी टीका सदा सरवणकरांच्या मुलीने केली.

सदा सरवणकरांच्या कन्या प्रिया सरवणकरांनी अमित ठाकरेंवर बोचरी टीका केली. नवीन चेहरा म्हणून प्रचार करताय, पिक्चर काढायचा आहे का? असा सवाल करत बोचरी टीका त्यांनी अमित ठाकरेंवर केली. इतकंच नाहीतर अमित ठाकरेंचं कर्तृत्व काय? असा सवालही त्यांनी यावेळी केला. माहिममध्ये मनसेकडून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात आहेत. तर ठाकरे गटाकडून महेश सावंत तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून सदा सरवणकर निवडणूक लढवत आहेत. अमित ठाकरे यांनी दारो-दारी जात आपला प्रचार सुरू केला. मात्र सेलिब्रिटी म्हणत सदा सरवणकरांच्या मुला-मुलींनी अमित ठाकरेंना घेरलंय. यावेळी प्रिया सरवणकर यांनी मनसेच्या संदीप देशपांडे यांच्यावरही निशाणा साधला. २०१९ मध्ये संदीप देशपांडे माहिममधून सदा सरवणकरांच्या विरोधात उभे होते. मात्र आता संदीप देशपांडे हे वरळीतून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात लढताय. त्यावरून पांडेजी म्हणत लाथ मारून वरळीला पाठवल्याचे प्रिया सरवणकर म्हणाल्या. यापूर्वी कधीही अशी टोकाची टीका मनसेवर सदा सरवणकर किंवा त्यांच्या मुलांकडून झाली नव्हती. मात्र प्रचार शेवटच्या टप्प्यात आल्यानं उघडपणे हल्लाबोल होतोय.

Published on: Nov 15, 2024 10:43 AM
Pankaja Munde :‘बटेंगे तो कटेंगेच्या’ वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या, ‘ऑन रेकॉर्ड बोलले का?’
Vinod Tawde : मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं मोठं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?