Jalna | माजी मंत्री अर्जुन खोतकरांना खासदार प्रीतम मुंडेंचं रक्षाबंधन
Arun Khotkar Pritam Munde | प्रीतम मुंडे आज जालना मध्ये एका साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यांनी अचानक शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांच्या घरी भेट देऊन रक्षाबंधन साजरे केल्यामुळे अनेक जणांच्या भुवया उंचावल्या आहेत.
एकीकडे भाजपा आणि शिवसेने मध्ये नारायण राणे शिवसेना यांच्यामुळे राज्यात तणाव असताना असताना माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना भाजपा खासदार प्रीतम मुंडे यांनी राखी बांधली. प्रीतम मुंडे आज जालना मध्ये एका साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यांनी अचानक शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांच्या घरी भेट देऊन रक्षाबंधन साजरे केल्यामुळे अनेक जणांच्या भुवया उंचावल्या आहेत.