नावात राणे, विचार चार आण्याचे, शिवसेना नेते बबनराव थोरात यांचं टीकास्त्र

| Updated on: Aug 30, 2021 | 12:56 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. शिवसेनेकडून नारायण राणे यांच्यावर टीका करण्यात येतीय. तर, नारायण राणे , निलेश राणे, नितेश राणे आणि भाजपकडून देखील शिवसेना नेत्यांना प्रत्युत्तर दिलं जातंय.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. शिवसेनेकडून नारायण राणे यांच्यावर टीका करण्यात येतीय. तर, नारायण राणे , निलेश राणे, नितेश राणे आणि भाजपकडून देखील शिवसेना नेत्यांना प्रत्युत्तर दिलं जातंय. शिवसेनेचे नंदुरबार धुळे संपर्कप्रमुख बबनराव थोरात आज हिंगोली जिल्ह्यात आले होते. या वेळी त्यांनी आज चौथ्या श्रावण सोमवार निमित्त औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग श्रीनागनाथ प्रभूचे सपत्निक शिखर दर्शन घेतले.पत्रकारांनी नारायण राणे संदर्भात विचारले असता ते म्हणाले- राणे साहेब नावात राणे असले तरी विचार चार आणे करतात त्या मुळे त्यांच्या वर भाष्य करणं योग्य नाही, अशा शब्दात टोला लगावला.

अनिल परब यांना ईडीची नोटीस हे केंद्र सरकारनं सुरु केलेल्या षडयंत्राचा भाग आहे. सूडाच्या राजकारणाचा तोटा भाजपलाच भोगायला लागणार आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मागे ईडी आणि सीबीआय लावण्याचा उद्योग केंद्रानं बंद करावा, असा इशारा सेना खासदार विनायक राऊत यांनी दिलेला आहे.

 

विरोधकांच्या मागं ईडी, सीबीआय लावण्याचे उद्योग बंद करावेत, विनायक राऊतांचा केंद्राला इशारा
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 30 August 2021