‘म्हणून आम्ही पून्हा आयोध्याला जातोय’, शिवसेनेच्या नेत्यानं कारण देत स्पष्टच सांगितलं

| Updated on: Mar 25, 2023 | 9:44 PM

VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 5 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.हा दौऱ्यामागचे नेमके कारण काय? शिवसेनेच्या नेत्यानं सांगितलं कारण

मुंबई : शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौऱ्यावर भाष्य केलं आहे. पाच तारखेला आमचा आयोध्या दौरा ठरलेला आहे. एक दिवसाचा हा दौरा असेल आणि आम्ही साखडं घातलं होतं की आम्हाला धनुष्यबाण आणि शिवसेना चिन्ह मिळाला की आम्ही सगळे रामाचं दर्शन घेण्यास येऊ… ते आम्हाला मिळालं आमचा नवस पूर्ण झाला त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा आयोध्याला चाललोय, असं भरत गोगावले यांनी म्हटलं आहे. दरम्यान शिवसेनेचे सर्व नेते रामल्ला आणि हनुमानगढीचं दर्शन देखील घेणार आहे. अयोध्येला जाऊन एकनाथ शिंदे प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेणार असून मुख्यमंत्र्यांतर्फे राज्याला आम्ही आशीर्वाद घेऊन येऊ तर शरयू नदीच्या काठी पूजा आणि आरती देखील करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Published on: Mar 25, 2023 09:44 PM
काँग्रेसतर्फे अंबरनाथमध्ये केंद्र सरकारविरोधात निदर्शनं, काय केला आरोप?
मनसे नेते अविनाश जाधव यांच्या जीवाला धोका! सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल