Shivsena नेत्या Dipali Sayyad यांनी घेतली Sharad Pawar यांची भेट | Maharashtra Kesari Wrestling
शरद पवारांची भेट घेऊन दिपाली भोसले सय्यद यांनी कुस्तीपटूंना (wrestling) भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. कोरोनामुळे कुस्तीपटूंचे होत असलेले नुकसान व अन्य गंभीर प्रश्नांकडे त्यांनी लक्ष वेधले. रखडलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र शासनाने तात्काळ सुरू करावी, अशी मागणी त्यांनी या बैठकीत केली.
मुंबई: कुस्तीपटूंच्या विविध समस्यांसंदर्भात सिनेअभिनेत्री व शिवसेना नेत्या दिपाली भोसले सय्यद (Dipali Sayyed) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांची भेट घेतली. शरद पवारांची भेट घेऊन दिपाली भोसले सय्यद यांनी कुस्तीपटूंना (wrestling) भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. कोरोनामुळे कुस्तीपटूंचे होत असलेले नुकसान व अन्य गंभीर प्रश्नांकडे त्यांनी लक्ष वेधले. रखडलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र शासनाने तात्काळ सुरू करावी, अशी मागणी त्यांनी या बैठकीत केली. याप्रसंगी उपमहाराष्ट्र केसरी व महापौर केसरी पैलवान अमृत मामा भोसले उपस्थित होते. त्यांनी कुस्तीगीरांच्या समस्या शरद पवारांसमोर मांडल्या. पवारांनी लगेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब लांडगे यांना फोन केला व दोन दिवसात निर्णय घेण्यासाठी शासन पातळीवरून हालचाली होतील, असे आश्वासन दिले.