Manisha Kayande | भाजपचे नेते फ्रस्ट्रेशनमध्ये आरोप करत आहेत - मनीषा कायंदे

Manisha Kayande | भाजपचे नेते फ्रस्ट्रेशनमध्ये आरोप करत आहेत – मनीषा कायंदे

| Updated on: Sep 14, 2021 | 8:45 PM

महाराष्ट्रात (Maharashtra) घडणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यावर अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेत, तक्रार दाखल केली आहे. भातखळकरांच्या आक्षेपावर आता शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी जोरदार पलटवार केलाय.

मुंबई : भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) घडणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यावर अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेत, तक्रार दाखल केली आहे. भातखळकरांच्या आक्षेपावर आता शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी जोरदार पलटवार केलाय. अतुल भातखळकर यांचं डोकं फिरलं आहे. त्यांचं डोकं ठिकाणावर नाही, असा घणाघात कायंदे यांनी केलाय. अतुल भातखळकर यांचे डोकं फिरलं आहे. त्याचं डोकं ठिकाणावर नाही. एखादा व्यक्ती कुठून आला, त्याची नोंद नसावी का? पोलिसांना तपास करावा लागतो. पोलिसांना गुन्हेगाराची पार्श्वभूमीची नोंद घ्यावी लागते. यात मुख्यमंत्री काय चुकीचं बोलले? बाळासाहेब ठाकरे यांनी हीच भूमिका कित्येक वर्षांपूर्वी मांडली असल्याचं कायंदे यांनी म्हटलंय.

Sanjay Raut Exclusive | शिवेसना खासदार संजय राऊतांशी ‘रोखठोक’ गप्पा
‘त्यांच्या’ मनात अश्लिल अर्थ नव्हता, प्रविण दरेकरांच्या वक्तव्यावर Chandrakant Patil यांचं उत्तर