Congress, NCP ची दुटप्पी भूमिका, शिवसेनेला न्याय कधी? Rajesh Kshirsagar यांचा सवाल

| Updated on: Mar 20, 2022 | 8:26 PM

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला महापालिकेत त्यांना यूती नको, पंचायत समितीत यूती नको, नगरपालिकेत यूती नको असताना शिवसैनिकांना न्याय  कधी मिळणार, असं राजेश क्षीरसागर म्हणाले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेला डावलत भाजपला सोबत का घेतलं याचं उत्तर देण्याची गरज आहे. उदय सामंत आणि अरुण दुधवडकर यांनी जिल्हा बँकेतील भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादीची यूती होत असेल तर शिवसेना संपर्क प्रमुखांनी आपली बाजू पक्षनेतृत्त्वाला पटवून द्यायला हवं होतं. महापालिकेत त्यांना यूती नको, पंचायत समितीत यूती नको, नगरपालिकेत यूती नको असताना शिवसैनिकांना न्याय  कधी मिळणार, असं राजेश क्षीरसागर म्हणाले. 6 मे 1986 पासून मी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करत राहिलो, असं राजेश क्षीरसागर म्हणाले.

Published on: Mar 20, 2022 08:26 PM
अंगार काय असतो हे भंगारांना दाखवून द्या, CM Uddhav Thackeray कडाडले
Special Report | बीड जिल्ह्याच्या बदनामीवरुन पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंमध्ये खडाजंगी – Tv9