कोण कुणाला गाडतंय… चंद्रकांत खैरे यांच्या ‘त्या’ आव्हानाला संदीपान भुमरे यांचं प्रतिआव्हान

| Updated on: Jul 28, 2024 | 3:58 PM

'मी निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असो किंवा नसो, पण मातोश्रीतून उद्धव ठाकरे यांचा आदेश आला की, या गद्दारांना पाडणार' असल्याचे वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं होतं. चौथ्यावेळेस जर निवडून येण्याच्या तयारीत असेल तर त्याला पाडलं पाहिजे...', चंद्रकांत खैरेंचा अप्रत्यक्षपणे संदीपान भुमरे यांच्यावर निशाणा

चंद्रकांत खैरे यांनी पहिले तिकीट आणून दाखवावं मग कोण कोणाला गाडतंय हे बघू, चंद्रकांत खैरे यांनी दिलेल्या आव्हानाला संदीपान भुमरे यांनी हे प्रतिआव्हान दिलं आहे. इतकंच नाहीतर चंद्रकात खैरे उभेच राहिले निवडणुकीस तर त्यांचं डिपॉझिट घालवू, असा इशाराही भुमरे यांनी दिलाय. दरम्यान, चंद्रकांत खैरे यांचं मातोश्रीवर वजन किती हे उमेदवारी मिळाल्यावर सिद्ध होईल, असं वक्तव्य करत संदीपान भुमरे यांच्या प्रतिआव्हानानंतर संजय शिरसाट यांनी देखील उत्तर दिलं आहे. ‘मी निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असो किंवा नसो, पण मातोश्रीतून उद्धव ठाकरे यांचा आदेश आला की, या गद्दारांना पाडणार’ असल्याचे वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं होतं. चौथ्यावेळेस जर निवडून येण्याच्या तयारीत असेल तर त्याला पाडलं पाहिजे, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी करत अप्रत्यक्षपणे संदीपान भुमरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Published on: Jul 28, 2024 03:58 PM
चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, इकडे नका तोंड खुपसू…
VIDEO : स्टंटबाजी आली अंगलट… पुराच्या पाण्यात त्यानं चालवली बाईक, पाण्याचा वेग अचानक वाढला अन्…