शिवाजी महाराजांच्या अपमानाचा निषेध करणाऱ्यांवर ‘राजद्रोहा’चा गुन्हा का?
शिवाजी महाराज यांच्यासोबत राहिलं तर भाजप शासित राज्यांमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येतो, हे चालणार नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर टीका केलीय.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटकमध्ये विटंबना झाली. या घटनेविरोधात बेळगावात मराठी तरुणांनी आंदोलन केले. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी या तरुणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. राजकारण करायचं असेल तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी महाराजांचे नाव घेतात. तर दुसरीकडे शिवाजी महाराज यांच्यासोबत राहिलं तर भाजप शासित राज्यांमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येतो, हे चालणार नाही, अशा शब्दात राऊत यांनी भाजपवर टीका केलीय. ते मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
Published on: Dec 31, 2021 11:07 AM