Sanjay Raut Uncut | भाजपविषयी गोव्याच्या जनतेत संताप - संजय राऊत

Sanjay Raut Uncut | भाजपविषयी गोव्याच्या जनतेत संताप – संजय राऊत

| Updated on: Jan 05, 2022 | 9:15 PM

शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीव्ही9 मराठीशी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी गोव्यातील महाविकास आघाडीच्या प्रयोगापासून ते महाराष्ट्रातील राजकारणापर्यंतच्या विविध प्रश्नांची त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.

पणजी: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून विरोधकांनी सल्ले देण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांची पिसे काढली आहेत. दोन-चार पादरेपावटे फुसफुसले म्हणजे सरकारला आग लागत नाही, असा हल्लाबोलच शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीव्ही9 मराठीशी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी गोव्यातील महाविकास आघाडीच्या प्रयोगापासून ते महाराष्ट्रातील राजकारणापर्यंतच्या विविध प्रश्नांची त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. आघाडी सरकार स्थिर राहणार का? याबाबत चर्चा सुरू आहे, याविषयी विचारताच, विरोधी पक्षातील दोन चार पादरे पावटे फुसफूसले म्हणून काय या सरकारला आग लागत नाही. पक्षातले आणि सरकारमधले यात फरक असतो, असं राऊत म्हणाले.

Special Report | राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढली पण त्या तुलनेत रुग्णालयातील बेड्स मात्र रिकामे
Special Report | बड्या नेत्यांच्या घरातही कोरोनाचा शिरकाव – Tv9