Sanjay Shirsat Video : जयंत पाटील दादांच्या राष्ट्रवादीत येणार? राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार? संजय शिरसाटांचा खळबळ दावा
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत एक मंत्री पद रिकामे झाले. नुकतीच अजित पवार यांच्या निवासस्थानी एक कोअर कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीत छगन भुजबळ गैरहजर राहिले. तर दुसरीकडे भूकंप येणार म्हणत जयंत पाटील यांनी एक दावा केला.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीला छगन भुजबळ गैरहजर राहिले. तर दुसरीकडे मंत्री संजय शिरसाट आणि अमोल मिटकरींनी जयंत पाटलांवरून मोठा दावा केला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत भूकंप येणार आणि जयंत पाटील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत येणार असा दावा संजय शिरसाट यांनी केला. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यानंतर दादाच्या राष्ट्रवादीत मंत्रीपदाची जागा रिकामी झाली. त्या जागेवर भुजबळांच्याही नावाची चर्चा आहे तर आता जयंत पाटील यांवरून सुद्धा दावे सुरू झाले. मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा खातं अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवलं आहे. पक्षांतर्गत वाद वाढू नये म्हणून अजित पवारांनी हे खातं स्वतःकडे ठेवल्याची माहिती आहे. रात्री कोअर कमिटीची बैठक झाली. त्या बैठकीला धनंजय मुंडे आले पण भुजबळ मात्र गैरहजर राहिले. कामानिमित्त ते गैरहजर राहिल्याचं तटकरेंनी सांगितलं. भुजबळांना आनंदाचा सिधा मिळो या शुभेच्छांच्या मागे मिटकरींना मंत्री पद सुचवायचं आहे. जहा नाही चैना वहाँ नाही रहना असं म्हणत त्यांनी बंदचा इशारा दिला होता पण त्यानंतर त्यांनी आपण अजित पवार सोबतच राहणार असल्याचं जाहीर केलं. त्यातच जयंत पाटील यांच्या एका वक्तव्याने पुन्हा एकदा उलट सुलट चर्चा सुरू झाली. माझी गॅरंटी घेऊ नका माझं काही खरं नाही असं जयंत पाटील राजू शेट्टींना उद्देशून म्हणाले. पण ते वक्तव्य शक्तीपीठ महामार्गावरील आंदोलनावरून होत असं स्पष्टीकरण सुद्धा जयंत पाटील यांनी दिलं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट