संजय राऊत यांची भुणभूण अजित पवार यांना आवडते का? शिंदेच्या शिवसेनेतील मंत्र्याचा खोचक सवाल
VIDEO | अजित पवार यांचं पाटणमधील भाषण नैराश्येतून, शिंदेच्या शिवसेनेतील मंत्र्याचा हल्लाबोल
सातारा : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळूण निघाले आहेत. शिंदे गटाच्या शिवसेनेतील मंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी अजित पवार यांच्याविषयी बोलतानाही त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. दादांचे आजचे पाटणमधील भाषण नैराश्यामधून केलेले होते. चिपळूण रस्त्याचे काम किती दिवस सुरू आहे अशी टीका अजित पवार यांनी केली होती. तसेच आता सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला नाही हे त्यांच्या भाषणामधून जाणवत होतं असा टोला त्यांनी यांना लगावला आहे. तसेच ज्या रस्त्याने दादा गेले तो तयार करायचे काम सुरु असलेला दादानां दिसला नसावा असा उपरोधिक टोलाही अजित पवार यांना त्यांनी लगावला आहे. तर मुख्यमंत्र्यांना बोललं तरी हेच पुढे पुढे बोलतात यांचीच दररोज भुणभूण असते अशी खोचक टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली होती. त्यावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, शिंदेसाहेब माझे नेते आहेत त्यांच्याबद्दल मला बोलले पाहिजे, पण संजय राऊत यांची भुणभूण अजित पवार यांना आवडते का असा प्रतिसवालही त्यांनी केला.