राज ठाकरेंची फुसकी तोफ, चिंता करण्याची गरज नाही – शिवसेना आमदार, पहा VIDEO

| Updated on: Apr 30, 2022 | 8:12 PM

राज ठाकरे उद्या शिवसेनेवर तोफ डागतील. त्या प्रश्नावर दानवेंनी "शिवसेनेने अशा अनेक तोफा बघितल्या आहेत. नुसत्या बघितल्या नाही, तर परतवून लावल्यात. त्यांची फुसकी तोफ आहे. फार चिंता करण्याची गरज नाही"

मुंबई: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादमध्ये आहेत. उद्या त्यांची तिथे सभा होणार आहे. त्याचवेळी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसीही आज औरंगाबादमध्ये आहेत. राज ठाकरे आणि असदुद्दीन ओवेसी यांनी एकाचवेळी औरंगाबादमध्ये असण्यावर शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी टीकेची तोफ डागली आहे. “संभाजी नगरमध्ये दोघे एकत्र आले, चांगलं आहे. संभाजीनगरच महत्त्व सगळ्यांना कळेल” असं त्यांनी सांगितलं. राज ठाकरे उद्या शिवसेनेवर तोफ डागतील. त्या प्रश्नावर दानवेंनी “शिवसेनेने अशा अनेक तोफा बघितल्या आहेत. नुसत्या बघितल्या नाही, तर परतवून लावल्यात. त्यांची फुसकी तोफ आहे. फार चिंता करण्याची गरज नाही” अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यावर टीका केली.

Published on: Apr 30, 2022 08:10 PM
आम्हा कुठेही भोंगे लावण्याची गरज नाही – रुपाली चाकणकर
Bacchu Kadu On Raj Thackeray : भोंगे उतरवल्यानं देश चालत नाही, परिस्थितीतून आपण बाहेर आलो पाहिजे