नारायण राणेंनी महाडमध्ये येऊ नये, शिवसेना आमदार भरत गोगावलेंचा इशारा
नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. महाडमध्ये नारायण राणे यांनी येऊ नये, असा इशारा भरत गोगावले यांनी दिला आहे.
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधून नारायण राणे समर्थक चिपळूणमध्ये जायला निघालेले आहेत. शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी नारायण राणे यांना महाडमध्ये येऊ नये, असा इशारा दिला आहे. सूक्ष्म आणि लघू मंत्रालय त्या खात्याची कुठेही चर्चा नाही असं त्यांना खातं देण्यात आलेलं आहे. नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. महाडमध्ये नारायण राणे यांनी येऊ नये, असा इशारा भरत गोगावले यांनी दिला आहे. राज्यभर शिवसैनिक आक्रमक होतील, असं भरत गोगावले यांनी सांगितलं आहे.