Video | मुंबईच्या शौचालयातही एवढी घाण नाही... रामदास कदमांवर कुणाची सणकून टीका?
Image Credit source: tv9 marathi

Video | मुंबईच्या शौचालयातही एवढी घाण नाही… रामदास कदमांवर कुणाची सणकून टीका?

| Updated on: Sep 19, 2022 | 12:35 PM

रामदास कदमांनी माझ्या मतदार संघात सभा घेतल्याचं काही नाही, मात्र उद्धव ठाकरेंबद्दल त्यांनी केलेलं आक्षेपार्ह विधान ऐकून राज्यातील जनता त्यांची जोड्याने पूजा करतील, असं वक्तव्य जाधव यांनी केलंय.

मुंबईः संपूर्ण मुंबईत जेवढी शौचालयं आहेत, त्यातून जेवढी घाण निघते, त्यापेक्षाही जास्त घाण रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी कालच्या सभेत ओकली, अशी घणाघाती टीका शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केली. बंडखोर नेते रामदास कदम यांची रविवारी दापोलीत (Dapoli) सभा झाली. या सभेत त्यांनी शिवसेनेतील नेते आणि उद्धव ठाकरेंवरची नाराजी बोलून दाखवली. त्याला प्रत्युत्तरादाखल भास्कर जाधव यांनी आज पत्रकार परिषद घेतली. रामदास कदमांनी माझ्या मतदार संघात सभा घेतल्याचं काही नाही, मात्र उद्धव ठाकरेंबद्दल त्यांनी केलेलं आक्षेपार्ह विधान ऐकून राज्यातील जनता त्यांची जोड्याने पूजा करतील, असं वक्तव्य जाधव यांनी केलंय.

Bhaskar Jadhav Full PC | मुंबईमध्ये सौचालयात घाण नाही तेवढी घाण रामदास कदमांनी ओकलीय

Published on: Sep 19, 2022 12:28 PM
शिंदे गट की शिवसेना? दसरा मेळावा कोणाचा?; शरद पवार म्हणतात एकनाथ शिंदेंनाही अधिकार पण…
महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिंदे गट, मनसेची युती होणार?, राज ठाकरे म्हणतात मी पण…