Dilip Lande | त्या ठेकेदारमुळे पक्षाच नाव खराब होतयं, त्याला जबाबदारी दाखवणं आमचं काम: दिलीप लांडे

| Updated on: Jun 13, 2021 | 3:10 PM

आधी कॉन्ट्रॅक्टरला फोन केला कॉन्ट्रॅक्टरला फोन उचलत नव्हता आणि म्हणून त्याला शोधून काढला नंतर त्याला तेथे आणून गटरच्या बाजूला बसवून त्याच्या डोक्यावर कचरा टाकायला लावला, असं आमदार लांडे म्हणाले.

शिवसेनेचे चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप लांडे यांनी नालेसफाईच्या कंत्राटदाराला चांगलाच हिसका दाखवलाय. आपल्या मतदारसंघातील नालेसफाईची पाहणी दिलीप लांडे यांनी आज केली. त्यावेळी नालेसफाई योग्यरित्या झाली नसल्याचं सांगत त्यांनी नालेसफाई कंत्राटदाराला चक्क नाल्यातील कचऱ्यावर बसवलं. इतकंच नाही तर या कंत्राटदाराच्या अंगावर नाल्यातील कचराही टाकला. त्यानंतर नालेसफाई कशी केली जाते हे सांगण्यासाठी शिवसैनिकांनी नाल्यातील कचरा आणि गाळ काढला. पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईवर अमाप खर्च केल जातो. मात्र, योग्यरित्या नालेसफाई होत नसल्याचं नाल्या तुंबल्याचं, नाल्यातील घाण पाणी रस्त्यांवर, अनेकांच्या घरात घुसल्याचं चित्र दरवर्षी पाहायला मिळतं. अशावेळी दिलीप लांडे यांनी नालेसफाई कंत्राटदाराला दाखवलेल्या हिसक्याची आता चांगलीच चर्चा होत आहे.

चांदिवली विधानसभा आमदार दिलीप मामा लांडे यांनी चक्क कॉन्ट्रॅक्टरला बसवला.  गटाराची साफसफाई न झाल्यामुळे दिलीप मामा लांडे यांचा संताप झाला.  आधी कॉन्ट्रॅक्टरला फोन केला कॉन्ट्रॅक्टरला फोन उचलत नव्हता आणि म्हणून त्याला शोधून काढला नंतर त्याला तेथे आणून गटरच्या बाजूला बसवून त्याच्या डोक्यावर कचरा टाकायला लावला, असं आमदार लांडे म्हणाले.

(Shivsena MLA Dilip Lande aggressive on Nalesafai contractor told the reason)

Published on: Jun 13, 2021 02:44 PM
VIDEO | निसर्ग बहरला, कणकवलीतील सावडाव धबधबा प्रवाहित
Headline | शिवसेनेकडे पाच वर्षे मुख्यमंत्रिपद राहणार, संजय राऊत यांचं नाशिकमध्ये वक्तव्य