Video : ईडीने हिरानंदाणी येथील माझं राहतं घर आणि मिरा रोडचा भूखंड जप्त केलाय-प्रताप सरनाईक

| Updated on: Mar 25, 2022 | 3:15 PM

शिवसेना (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी माध्यमांसमोर ईडीनं (ED) त्यांची संपत्ती जप्त केल्यासंदर्भात बाजू सविस्तरपणे मांडली. वस्तुस्थिती आहे, ईडीनं गेल्या आठवड्यातील माझं राहतं हिरानंदानी येथील घर आणि मिरा रोड येथील भूखंड जप्त केल्याबद्दल मला आणि कुटुंबीयांना नोटीस पाठवलेलं आहे. त्यानंतर त्या नोटीसला मी कायदेशीर प्रक्रियेप्रमाणं उत्तर देतोय. आता 2022 आहे आणि 24 नोव्हेंबर 2020 रोजी […]

शिवसेना (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी माध्यमांसमोर ईडीनं (ED) त्यांची संपत्ती जप्त केल्यासंदर्भात बाजू सविस्तरपणे मांडली. वस्तुस्थिती आहे, ईडीनं गेल्या आठवड्यातील माझं राहतं हिरानंदानी येथील घर आणि मिरा रोड येथील भूखंड जप्त केल्याबद्दल मला आणि कुटुंबीयांना नोटीस पाठवलेलं आहे. त्यानंतर त्या नोटीसला मी कायदेशीर प्रक्रियेप्रमाणं उत्तर देतोय. आता 2022 आहे आणि 24 नोव्हेंबर 2020 रोजी माझ्यावर कारवाई झाली होती. मला असं वाटतं की राज्यातील सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून पहिली कारवाई होती. त्यानंतर अनेक लोकांवर कारवाई झाली. यानंतर मला अनेक लोकांनी विचारलं की तुमच्यावरील कारवाई संपली का ? मात्र, मी त्यानंतर कायदेशीर लढाई लढतोय, असं प्रताप सरनाईक म्हणाले. तर, ईडीच्या कारवाईला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचं प्रताप सरनाईक म्हणाले.

भंडारा जिल्ह्यात ट्रकने धडक दिल्याने इसमाचा मृत्यू
Video : मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना आयकर विभागाची नोटीस