शिवसेना नेत्यांवर थेट आरोप करुन तुम्ही कुठली निष्ठा दाखवताय? सचिन अहिर

| Updated on: Jul 23, 2022 | 3:32 PM

सुरक्षेच्या बाबतीत एकनाथ शिंदेंबरोबर पक्ष नेतृत्वाने कधीही दुजाभाव केला नाही" असा दावा शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी केला.

मुंबई: “सुरक्षेच्या बाबतीत एकनाथ शिंदेंबरोबर पक्ष नेतृत्वाने कधीही दुजाभाव केला नाही” असा दावा शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी केला. “कोणीही नेतृत्वावर आरोप करु नका. पक्षप्रमुख उद्धवजी आमचे नेते आहेत, आम्ही शिवसेनेमध्ये आहोत, असं सांगत होते. आता शिवसेना नेत्यांवर थेट आरोप करुन तुम्ही कुठली निष्ठा दाखवताय?” असा सवाल सचिन अहिर यांनी केला. त्यांचं पितळ आता उघड पडलय, अशी टीका अहिर यांनी केली. त्यांची निष्ठा सत्तेसाठी आहे, अस सचिन अहिर म्हणाले.

Published on: Jul 23, 2022 03:32 PM
VIDEO : Parbhani Rain | 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा ढगाळ वातावरण, रात्रीपासून रिमझिम पाऊस
नारायण राणे फुटल्यानंतर भाई गोवेकरांचा आजही पत्ता नाही – किशोरी पेडणेकर