BJP Jan Ashirwad Yatra | नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेवर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया
नारायण राणे यांना विरोध करायचा की त्यांना स्मृती स्थळावर दर्शन येऊ द्यायचं याबाबतीत पक्षाकडून अद्याप कुठलेही आदेश आलेले नाहीत, असं स्पष्ट करत बाळासाहेबांपुढे नतमस्तक व्हायला कुणी येत असेल तर त्याला विरोध का करायचा, असा सवाल शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी उपस्थित केला आहे.
बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा राणेंना नैतिक अधिकार नाही. शिवसैनिक त्यांना स्मृती स्थळावर येऊ देणार नाही, असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिला होता. मात्र आज शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी मात्र आम्हाला पक्षाचे कोणतेही तसे आदेश नाहीयत. बाळासाहेबांपुढे नतमस्तक व्हायला कुणी येत असेल तर त्याला विरोध का करायचा?, असा सवाल विचारुन शिवसेनेमधले मतप्रवाह स्वत:च अधोरेकित केले आहेत.