संजय राऊत हे का थुंकताय? शिवसेनेच्या ‘या’ नेत्यानं थेट कारणच सांगितलं, अन् म्हणाले…
VIDEO | पकंजा मुंडे भाजपमध्ये नाराज असलेल्या चर्चांवर शिवसेनेच्या नेत्यानं केलं भाष्य; म्हणाले, 'येत्या काळात...'
बुलढाणा : संजय शिरसाट आणि श्रीकांत शिंदे यांचे नाव घेतल्यानंतर संजय राऊत थुंकत आहेत, त्याचं कारण असं की, गेल्या वर्षभरापासून संजय राऊत हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांचे तळवे चाटत आहेत आणि त्यामुळेच त्यांना मळमळ होत असल्याने ते थुंकण्यातून बाहेर पडत आहे, असा पलटवार शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे. तर शिवसेनेचे आणि भाजपाचे अनेक जन त्यांच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य अनिल देशमुख यांनी केले होते. यावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आमचे कोणी कुठेही जाण्यासारखे नाहीत, तुमचेच तुम्ही सांभाळून ठेवा, गेल्या विधानसभेच्या वेळी पवार साहेबांची मेहरबानी त्यांनी ताकद लावली, नाहीतर छप्पन पैकी केवळ सहा उरले होते. त्यामुळे आपण आपलं सांभाळा आमच्यामध्ये तोंड खूपसू नका, असे म्हणत अनिल देशमुख यांना आमदार गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
पकंजा मुंडे भाजपमध्ये नाराज असलेल्या चर्चांवर बोलताना संजय गायकवाड म्हणाले, पंकजा मुंडे यांच्या मनातील खदखद नेहमी समोर आली आहे, परंतु त्या काही निर्णय घेऊ शकत नाही असं दिसतंय, त्यांच्यासोबत काय चाललंय हे देखील सर्व लोकांना कळत आहे, परंतु येत्या काळात भाजपामध्ये त्यांना योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा करूयात. पंकजा मुंडे यांना जर भाजपमध्ये असुरक्षित वाटत असेल तर त्या निर्णय घेण्यास सक्षम आहेत त्यांना कुठला पक्ष आवडतो हे महत्त्वाचे आहे.