पहाटेच्या शपथविधीवर सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय शिरसाट म्हणाले…
VIDEO | पहाटेच्या शपथविधीवर सुधीर मुनगंटीवार यांचं ते वक्तव्य योग्य की अयोग्य, काय म्हणाले संजय शिरसाट?
संभाजीनगर : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी होता, असा मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुनगंटीवार म्हणाले, 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी जनादेशाचा अवमान केला. त्यांनी निवडणूक आमच्यासोबत लढवली. परंतु त्यानंतर विश्वासघात केला. यामुळे हे एक राजकीय ऑपरेशन होते. एक गमिनी कावा होता. उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता,असे ते म्हणाले. यावर ठाकरे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी पहाटेच्या शपथविधीवर केलेलं वक्तव्य योग्य असल्याचे म्हणत संजय शिरसाट म्हणाले, जेव्हा तुम्ही युतीत निवडणूक लढवतात एकीकडे मोदी आणि बाळासाहेब यांचा फोटो वापरून मतं मागतात. प्रत्येक मतदारसंघात शिवसेना आणि भाजपचे मत असतात. ही जेव्हा एकत्रित आले तेव्हा उमेदवार निवडून आला. तेव्हा सत्तेची लालसा वाटून दुसरीकडे जाण्याचा निर्धार केला. त्यावेळीची खेळी योग्य होती, असे स्पष्टपणे संजय शिरसाट यांनी म्हटले.