रिक्षावाला मुख्यमंत्री तर टपरीवाला…, या टीकेवर संजय शिरसाट यांचा पलटवार, कुणावर केला हल्लाबोल?

| Updated on: Feb 02, 2024 | 4:45 PM

तीन रंगाचं हे सरकार आहे. दोन बायका आणि फजिती ऐका, काय चाललंय या सरकारमध्ये असा सवाल करत एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. तर एकनाथ खडसे पुढे असेही म्हणाले की, कुणाकुणाचं काय भाग्य फुलतं, रिक्षावाला मुख्यमंत्री होतो तर टपरीवाला मंत्री होतो

मुंबई, २ फेब्रुवारी २०२४ : तीन रंगाचं हे सरकार आहे. दोन बायका आणि फजिती ऐका, काय चाललंय या सरकारमध्ये असा सवाल करत एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. तर एकनाथ खडसे पुढे असेही म्हणाले की, कुणाकुणाचं काय भाग्य फुलतं, रिक्षावाला मुख्यमंत्री होतो तर टपरीवाला मंत्री होतो, अशी खोचक टीका एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर केली. दरम्यान एकनाथ खडसे यांनी केलेल्या खोचक टीकेवर शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय. ‘आमचा संसार सुखाचा चालला आहे. आमची फजिती वैगरे काही नाही.’, असे म्हणत संजय शिरसाट यांनी एकनाथ खडसे यांच्यावर पलटवार केलाय. तर एकनाथ खडसे यांनी महिलांवर बोलणं हा सुद्धा विनोद झालाय, असे वक्तव्य करत खोचक टोलाही शिरसाट यांनी लगावला.

Published on: Feb 02, 2024 04:35 PM
‘ट्रायडंट’वर वंचित अन् ‘मविआ’मध्ये बैठक, प्रकाश आंबेडकर कोणत्या मुद्द्यावर करणार चर्चा?
संजय शिरसाट म्हणाले बाळासाहेबांची चप्पलही लाखमोलाची तर राजन साळवी म्हणाले खूर्चीची किंमत करणं म्हणजे…